सूरज देवकाते
बारामती(दि २१) :अनेक दिवसांपासून ठप्प झालेली बारामती बाजारपेठ आता पूर्ववत होणार आहे . बारामतीत काही दुकानांना दोन तर काहींना तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती . आता मात्र नवीन निर्णयाप्रमाणे काही अपवाद वगळता इतरही सर्व दुकाने तसेच दैनंदिन व्यवहार सुरू ठेवता येणार आहेत.
ठराविक अटी व शर्तींना अधीन राहून बारामतीत
शुक्रवारी २२ मे पासून व्यवहार दररोज सुरू राहणार आहेत. आजपर्यंत दोन व तीन दिवसच दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता मात्र शुक्रवारपासून हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरंट, शाळा महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, मॉल्स आदी वगळता इतर सर्वांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रत्येकाने मास्कचा वापर करणे , शारीरिक अंतर राखणे , सॅनेटायझर्सचा वापर करणे यासह इतरही अटींचे पालन करून तसेच गर्दी होणार नाही , याची काळजी घेत व्यवहार पूर्ववत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ही यास दुजोरा दिला आहे.
Post a Comment