माळेगाव प्रतिनिधी- 
     दरवर्षीच्या पंरपरेप्रमाणे कामगार दिनाचे औचित्य साधून सरपंच जयदीप तावरे यांनी कामगारांना प्रती महिना पाचशे रुपयांची वाढ दिली आहे.याचा फायदा 52 कर्मचारी यांना होणार असुन कामगार वर्गाने आनंदोत्सव साजरा केला.
      बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून माळेगावची ओळख आहे.हि ग्रामपंचायत दरवर्षी 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून पगारवाढ करत असते.आज ही या परंपरेचे पालन करत कामगारांना पगार वाढ केली आहे.
      सरपंच जयदीप तावरे,उपसरपंच अजित तांबोळी व ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे,सदस्य जयदीप तावरे,अशोक सस्ते,राजेंद्र चव्हाण,प्रशांत मोरे,अनिल लोणकर,राजाभाऊ खरात व कामगार शंकर ठोंबरे,राजु शेख,आबा चव्हाण,दिलीप जाधव,अमोल वदक,दादा ठोकळ,रेश्मा शेख यांच्यात बैठक झाली.यावेळी पगारात एक हजार रुपये वाढ करावी अशी मागणी आबा चव्हाण यांनी केली.
      मात्र ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन दरमहा पाचशे रुपये पगार वाढ सर्वानुमते ठरली.या घोषणेचे स्वागत पुणे व सातारा श्रमिक संघाचे सरचिटणीस व माळेगाव कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकर ठोंबरे यांनी केले आहे.
       दरम्यान माळेगाव ग्रामपंचायतीमधे 6 कार्यालयीन ,10 आरोग्य,25 सफाई ,11 पाणीपुरवठा असे 52 कर्मचारी आहेत.ग्रामपंचायतीस दरमहा साडेतिन लाख रुपये पगार द्यावा लागतो. पगारवाढीसाठी अतिरिक्त 26 हजार रुपये लागणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी एस बी साळुंखे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post