माळेगाव  प्रतिनिधी- 
      मुस्लिम  बांधवांनी रमजान  ईद  घरीच साजरी करावी.इदगाह  व मस्जिद मधे गर्दी  करु नये.स्वतः व इतरांची काळजी  घ्यावी  असे आवाहन  पोलिस  निरीक्षक  आण्णासाहेब  घोलप यांनी  केले आहे.
   माळेगाव  पोलिस  दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील गावातील  सर्व  मुस्लिम  बांधव व पोलिस  यांच्यात रमजान  ईद बाबत बैठक  झाली. यावेळी  बोलताना  पोलिस  निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी  प्रथम मुस्लिम  बांधवांना  रमजान  ईदच्या  शुभेच्छा  दिल्या. कोरोनाचे मोठे संकट  निर्माण झाले  आहे. याचा फटका  सर्वांना  बसत आहे. या पार्श्वभूमीवर  मुस्लिम  बांधवांनी  शासनाच्या  नियमांचे  पालन  करुन घरीच  नमाज पठण  करावे.इदगाह  व मस्जिदमधे  सामुहिक  नमाज पठण करु नये.घरीच सुरक्षित  अंतर ठेऊन नमाज पठण करुन ईद साजरी करावी.
   यावेळी  पोलिस  प्रशासन  व मुस्लिम  बांधवांनी  विविध  विषयांवर  चर्चा  केली.यावेळी  सहायक  पोलिस  निरीक्षक  प्रमोद  पोरे,
 उपसरपंच अजित तांबोळी, शकील सय्यद, शौकत शेख,कुरबान बागवान,  रहमान शेख,वसीम शेख,रियाज शेख इम्तियाज शेख,रियाज सय्यद तोफिक शेख ,हमीद शेख,मुस्ताक शेख ,जावेद शेख ,जावेद बागवान हे मान्यवर उपस्थित होते.मुस्लिम  समाज  नेहमी कायद्याचे  पालन करत असतो.शासनाच्या  आदेशानुसार  रमजान  ईद  साजरी  करु असे  आश्वासन  उपसरपंच  अजित  तांबोळी यांनी तमाम  मुस्लिम  बांधवांच्या  वतिने   दिले.

Post a Comment

أحدث أقدم