कोहाळे बु। (दि: 5) : को-हाळे बु। येथिल सामाजिक कार्यकर्ते हरिश (नाना) गाडे यांचे आज दि: ५ मे रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गाडे यांना दोन दिवसापुर्वी अचानक काही त्रास जाणवू लागल्याने बारामतीतील खाजगी दवाखाण्यात दाखल केले होते. मात्र शुगर, रक्तदाब, व लघवीचा त्रास असल्याने बारामतीतील डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना  पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज पहाटे  पुण्यात उपचार घेत असताना  त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर आज दुपारी को-हाळे बुद्रुक नजिक १५ फटा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे  हरिश (नाना) गाडे यांच्या निधनाने को-हाळे बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या  पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

أحدث أقدم