सचिन वाघ
बारामती: दि.16:- कोऱ्हाळे बुद्रुक येथील भगत कुटुंबीयांनी 'कोरोना' विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19'साठी एकावन्न हजार रुपये मदतीचा धनादेश आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19'साठी एकावन्न हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज भगत कुटुंबीयातील सदस्य सुनिल (तात्या) भगत, विलास (भाऊ)भगत, आदित्य भगत, प्रथमेश भगत यांनी सुपूर्द केला.
भगत कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.
Post a Comment