बारामती दि:२३ - कोरोना (covid 19) विरोधातील लढाईत प्रशासन ,पोलिस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे रात्रंदिवस सेवा करत आहेत ते करत असलेले काम हे अनोखे आहें. कोरोना योध्ये हे दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत व सर्व नागरिकांचे रक्षण करीत आहेत.या करोना विरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी आज बारामती अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय ,रुई ग्रामीण रुग्णालय येथे करोना योध्यांसाठी गिफ्ट्स अव्हेन्यू चे अभिजितशेठ बोरा , स्काय ऍग्रोचे केतनशेठ भोंगळे, योगेश शेठ राऊत ,युनिक ग्लासचे उमेश पांढरे पाटील यांचे मार्फत Face शील्ड व मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चंद्रशेखर यादव व रुई ग्रामीणचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुनील दराडे व डॉ.संजय घुले उपस्थित होते. जनतेच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आव्हान पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. तसेच कोरोना विरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
बारामतीत कोरोना योद्धांना फेस शिल्ड व मास्कचे वाटप. सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment