बारामती - हेमंत गडकरी
बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरातील कल्याणीनगर भागात कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता चौदावर जाऊन पोचली आहे.
हा युवक तीस वर्षीय असून तो पुण्याहून आला होता. त्यामुळे त्याचे विलगीकरण करण्यात आले होते. मात्र त्याची तपासणी करण्यात आली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तांदुळवाडी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर या रुग्णावर बारामतीच उपचार सुरू असल्याची माहिती बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे बारामती शहर कोरोना मुक्त झाले होते. शहरातील कोरोना रुग्णाची संख्या शून्यावर आली होती मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागातील माळेगाव बुद्रुक, कटफळ, मूर्टी व वडगाव निंबाळकर भागात कोरोनाचे रुग्ण आढळले होते.
मात्र आता तब्बल ४१ दिवसानंतर बारामती शहराच्या महत्वाच्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा बारामतीकारांच्या चिंता वाढल्या आहेत.
Post a Comment