माळेगाव प्रतिनिधी-
वायु गळितातील उपचार घेत असलेल्या कामगाराचा पुण्यात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी (23 मे) रोजी कारंजाच्या पॅन टाकीची स्वच्छता करताना मिथेन वायुमुळे आठ कामगारांना त्रास झाला. यातील काही कामगार हे जास्त त्रास होत असल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पुण्यात उपचार सुरू असताना शिवाजी भोसले( रा.22 फाटा खांडज ता.बारामती )यांचे निधन झाले.त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान शिवाजी भोसले याच्या मृत्यू मुळे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी तिव्र दुःख व्यक्त केले आहे. कारखाना परिसर शोक सागरात बुडाले आहे.
दरम्यान सदर घटनेतील बाधित कामगार जालिंदर भोसले,रामभाऊ येळे,घनश्याम निंबाळकर यांच्यावर पुण्यात उपचार चालू आहेत.तर इतर कामगारांवर बारामतीत उपचार चालू असुन सर्वांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Post a Comment