प्रशांत नाना सातव यांना आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. तसेच इतर चार आरोपी यांना जिल्हा व सत्र न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला व  सर्व आरोपींची आज मुक्तता झाली.
  आरोपींच्या वतीने कलम ३५३ लागू होत नसल्याचा   युक्तिवाद वकिलांनी  केला. यावर कोर्टाने देखील त्यांचे निरीक्षण आदेशात व्यक्त केले आहे . तसेच इतर चार आरोपींचा जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी दि २० रोजी तपासी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत . आरोपींच्या वतीने अॅड. पाटसकर, अॅड. राजेंद्र काळे ,अॅड.अमर काळे यांनी काम पाहिले.बारामती कोर्टात वकील व पोलिस यांच्यात हाणामारी झाल्याने कोर्टामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे वातावरण दिसत होते.पोलिस व वकील यांच्या मधिल वाद मिटलेला असून, वकील व पोलिस यांच्यात भविष्यात संबंध सुधारण्यासाठी ज्येष्ठ वकील प्रयत्न करणार असल्याचे कळते.

Post a Comment

أحدث أقدم