बारामती - हेमंत गडकरी
बारामती तालुक्यातील माळेगाव मधील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे आता बारामतीतील कोरोनाचा आकडा दहावर पोहोचला आहे.
मध्यंतरीच्या काळात बारामती शहरात बारामती पॅटर्नची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने बारामती तालुका व शहर कोरोना मुक्त झाले होती. मात्र बारामती शहरानजीक असलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा नऊवर पोचला होता. याआधीही माळेगाव मधेच लकडेवस्तीत एक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
यावेळी सापडलेला रूग्ण महावितरण खात्यात पुण्यात वायरमन म्हणून कार्यरत आहे. ८ मे रोजी पुण्यातून माळेगावला आला होता. मात्र या रुग्णाच्या जवळच्या रुग्णाला ५ मे रोजी कोरोना झाला होता त्यामुळे हा रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये होता. त्यामुळे या रुग्णाने माळेगाव ला येताच ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. यासाठी रुग्णाचे घरीच विलगीकरण करण्यात आले होते. या रुग्णाचे स्वब तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते यात त्या रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असून प्रशासनाच्या वतीने माळेगाव सील करण्यात आले आहे.
Post a Comment