l
बारामती दर्पण
माळेगाव: माळेगाव व परिसरातील सुमारे 75 गरजूंना पोलिसांच्या वतिने अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली. या निमित्ताने पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडले.
या कोरोना रोगाच्या जागतिक महामारी च्या संकटात ज्या गरीब कुटुंबाचे हातावरचे पोट आहे, रोजच्या थोड्याफार कमाई नंतर या लोकांना कसेतरी एक वेळचे अन्न प्राप्त होते. या कोरणा संकटात त्यांची रोजीरोटी धोक्यात येऊन एक वेळच्या अन्नाची सुद्धा त्यांना आता भ्रांत पडू लागली आहे, अशा कष्टाळू पण हतबल लोकांसाठी आम्ही काहीतरी करावे या भावनेने त्यांचे रोजचे उपास मारीवर काही अंशी मात करू शकू या भावनेपोटी माळेगाव परिसरात राहणारी 75 गरीब कुटुंबे यांना माळेगाव चे पोलिसांन तर्फे अन्नधान्य व रोजच्या जीवनात आवश्यक लागणारे गोष्टींचा मोफत पुरवठा करण्यात आला.
यावेळी पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप ,सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे,पोलिस हवालदार जयंत ताकवणे, रमेश नागटिळक, योगेश चितारे,निखिल जाधव, नितीन चव्हाण, अमोल खांडेकर, विक्रम मदने, हेमंत कोकरे, हे उपस्थित होते.
Post a Comment