बारामती दर्पण
(बारामती प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रविराज अॅग्रो बारामती या कंपनीचे मालक श्री.अजित तानाजी सस्ते रा.ढेकळवाडी ता.बारामती यांनी देशात व राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण ठेवणेसाठी मोफत हायड्रोक्लोराईड व ब्लेचिंग पावडरचे बारामतीत वाटप केले. तसेच गावामध्ये फवारणी करून गावाचा परिसर निर्जंतुकीकरण करणेसाठी सामाजिक भावनेतून व सेवाभावी वृत्तीने बारामती तालुक्यातील होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, नीरावागज, मेखळी, पिंपळी, ढेकळवाडी, काटेवाडी, कन्हेरी, कारखेल, वडगाव निंबाळकर, सोनकसवाडी, गोजुबावी, जळगांव क.प, लोणी भापकर, देऊळगाव रसाळ, कऱ्हावागज, वंजारवाडी, खराडेवाडी, कुरणेवाडी , इ.बारामती व इंदापूर तालुक्यातील गावांना १२५० लिटर १०% सोडियम हायड्रोक्लोराईडचे मोफत वाटप करण्यात आले. एक ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकाने अशा संकट समयी ग्रामपंचायतींना मदत केल्याबद्दल श्री.अजित सस्ते यांचे मा.ना.अजितदादा पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी रविराज ऍग्रो, बारामतीचे श्री.अजित सस्ते, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले, बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप बापू धापटे, बारामती दुध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती मार्केट कमिटीचे सभापती अनिल खलाटे, तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे आदी उपस्थित होते.

إرسال تعليق