सोमनाथ लोणकर(को-हाळे बु!)         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर को-हाळे बु।गाव उद्यापासून पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने  घेतला आहे. पुणे जिल्हयात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला असल्याने आता जिल्हयाच्या ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. आजच  इंदापूर तालुक्यातील भिगवण गावात ही एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. को-हाळे गावची यात्राही याच पाच दिवसांत असल्याने को-हाळे बु गावाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवार दि:२९ एप्रिल पासून पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .या आदीही को-हाळे बु। गावाने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आठवड्यातून तीन दिवस गाव बंद ठेवले होते. मात्र आता ही बंदी वाढवत पाच दिवसावर नेली आहे .त्यामुळे निश्चितच को-हाळे बु गावचा हा निर्णय कौतुकास पात्र ठरत आहे. असे असले तरी पाच दिवसाच्या बंदी नंतर साहव्या दिवशी किराणा मालाची दुकाने सुरु होतील, मात्र दुकाना समोर गर्दी न करण्याचे आव्हाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.अशी माहिती गावच्या महिला सरपंच अश्विनीताई गुळुंमकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post