बारामती - हेमंत गडकरी
बारामती तालुक्यात कोरोनाचे तब्बल आठ रुग्ण सापडल्याने बारामती तालुका रेड झोन मध्ये गेला होता. मात्र आता कोरोनाचा आठवा रुग्ण बरा झाल्याने बारामती कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
     29 मार्च रोजी बारामतीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तो एक रिक्षाचालक होता. मात्र उपचारानंतर तो ठणठणीत बरा झाला होता. त्यानंतर समर्थनगर भागात एक भाजी विक्रेता कोरोना पोसिटिव्ह आढळला होता. त्याचा मुलगा, सून व दोन नातवंडांना ही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यानंतर त्या वृद्ध भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. तर इतर कुटुंबीय उपचारांनंतर बरे झाले होते त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना औंध रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. त्यानंतर म्हाडा कॉलनीतील एका जेष्ठाला कोरोनाची लागण झाली होती.मात्र त्या रुग्णाने ही कोरोनावर यशस्वी मात केली.
   त्यानंतर बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला होता. माळेगाव लकडेनगर येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. त्यात त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र सुदैवाने त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली नव्हती. आता बारामतीतील शेवटचा रुग्ण ही बरा झाल्याने बारामती तालुक्याने आता सुटकेचा निःश्वास टाकला असून आता बारामती तालुका रेड झोन मधूब ऑरेंज झोन मध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

أحدث أقدم