बारामती दर्पण
को-हाळे बु। : बारामती तालुक्यात कोणताही नवीन कोरोना रुग्ण सापडला नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. शिरीष्णे येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ग्रामीण भागात कोणताही नविन पेशंट नाही अशी माहीती त्यानी सा.बारामती दर्पणला दिली आहे. मागील दोन दिवसापासून तालुक्यातील शिरिष्णे ,मुरूम, को-हाळे बुद्रुक या गावात कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याची अफवा पसरवली गेली होती. त्यामुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले होते. अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न जाता सर्वांनी स्वताची काळजी घेतली पाहीजे तसेच सोशल डिस्टन्स चे पालन करण्याची गरज अाहे तरच कोरोनाची लढाई आपण जिंकू शकतो असेही त्यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील सर्व गावच्या ग्रामपंचायतींनी डेटॉल साबन, हॅन्ड वॉश, सॅनिटायझर चे घरोघरी मोफत वाटप केले अाहे तसेच गावात औषध फवारणी करून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कंबर कसली आहे व ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहनही केले जात आहे.तसेच आपत्ती व्यवस्थापन कमिटीही गावात चोखपणे काम करत असून ग्रामीण भागातील लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.

Post a Comment