माळेगाव प्रतिनिधी-
  डाॅ.सैफुल्ला खान एज्युकेशन ट्रस्टच्या वतिने 130 गरजूंना अत्यावश्यक वस्तु वाटप करण्यात आल्याची माहिती आझम खान यांनी दिली.
   सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या व अडचणीच्या काळात सेवाभावी वृत्तीने डाॅ.सैफुल्ला खान एज्युकेशन ट्रस्टच्या वतिने कोरोनाच्या प्रादूर्भावमुळे अनेक कुठुंबाला रोजच्या गरजेच्या वस्तु मिळत नव्हत्या.हाताला कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली होती.
  हिच बाब लक्षात घेऊन गरजु 130 लोकांना तांदूळ,तेल,साखर,गहु,मास्क या वस्तुचे वाटप करण्यात आले.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून गरजूंना मदत केली असे डाॅ.सैफुल्ला खान एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आझम खान यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم