माळेगाव प्रतिनिधी-
        राज्य राखिव पोलिस दल व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांना सामाजिक भावनेतून फिरोज पठाण यांनी चिक्की व मटनाचे वाटप केले.
      बारामती तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या माळेगाव येथे गेली महिनाभर राज्य राखिव पोलिस दलाचे जवान विविध भागात बंदोबस्त करत आहेत.त्यांना वाढत्या उन्हाचा त्रास होत आहे.या जवानांचा थकवा दुर व्हावा यासाठी त्यांना शेंगदाणा चिक्की वाटप करण्यात आले.यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अमित तावरे,प्रविण बनसोडे,प्रदीप जाधव यांच्यासह जवान उपस्थित होते.
     दरम्यान माळेगाव ग्रामपंचायतीच्या वतिने प्रत्येक भागात स्वच्छता ठेवण्यासाठी सफाई कामगार हे मोठ्या हिमतीने काम करत आहेत.कोरोनाच्या संकटात देखील ते काम करत आहेत.या सर्व कामगारांना मटन वाटप करण्यात आले. जवान व कर्मचारी हे सेवा बजावत असुन एका सामाजिक भावनेतून मदत केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم